रोटी घाटाचा अवघड टप्पा वैष्णवांकडून लिलया पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटी घाटाचा अवघड टप्पा वैष्णवांकडून लिलया पार
रोटी घाटाचा अवघड टप्पा वैष्णवांकडून लिलया पार

रोटी घाटाचा अवघड टप्पा वैष्णवांकडून लिलया पार

sakal_logo
By

पाटस, ता.२७ : संततधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत, मुखी विठ्ठल नामाच्या जयघोष करत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील रोटीच्या नागमोडी घाटाचा अवघड टप्पा लिलया पार केला.
हातातील भगव्या पताका, टाळ-मृदंगांच्या गजराने घाट परिसर अक्षरशः दुमदुमला गेला होता. हे दृश्य सर्वांसाठी पर्वणी ठरल्याची भावना व्यक्त होत होती. वरवंड येथील रविवारी रात्रीचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा नियोजित वेळेच्या विसाव्यासाठी सकाळी नऊ वाजता पाटस येथे दिमाखात दाखल झाला.
पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत राजकीय, शासकीय पदाधिकारी तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. नागेश्वर मंदिरात आरती, पूजन करून पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीच्या दर्शनासाठी दौंड तालुक्यातील गावांसह, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत आदी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. गावातील सामाजिक व सेवाभावी संस्थांनी वारकऱ्यांसाठी भोजन, नाष्टा, चहा, पाणी आदीची सोय केली.
रोटी व वासुंदे गावा मध्ये पालखी सोहळ्याचा नियोजित विसावा घेण्यात आला.यावेळी पालखीसोहळ्याचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले.

डोंगराच्या माथ्यावर अनेकांनी गर्दी
विसाव्यानंतर पालखी सोहळा पुढील मुक्काच्या ठिकाणी बारामती तालुक्यातील उंडवडीकडे मार्गस्थ झाला. दुपारी एक वाजता पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत लाखो वैष्णवांसह पालखीचे रोटी घाटात आगमन झाले. यावेळी नागमोडी वळणाच्या मुख्य ठिकाणी पालखी रथाला अतिरिक्त बैलजोडी जोडण्यात आली. त्यानंतर विठ्ठल नामाचा एकच जल्लोष करीत तल्लीन झालेल्या पालखी सोहळ्याने घाटाचा अवघड टप्पा पार केला. घाटातील वारीचे विलोभनीय दृश्य टिपण्यासाठी डोंगराच्या माथ्यावर अनेकांनी गर्दी केली होती.

73981

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m84285 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..