
टेम्पो-दुचाकीच्या धडकेत वडील व मुलीचा मृत्यू
पाटस, ता. २७ : पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस (ता. दौंड) येथे विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या टेंपोची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील वडील व मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर मुलीची आई गंभीर जखमी झाली. अतुल सिगारेट काळे (वय ३०) व इंद्रायणी काळे (वय दीड), असे या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर, जयश्री काळे या गंभीर जखमी झाल्या.
याबाबत सुकेश काळे (रा. पाटस) यांनी पाटस पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस नाईक अजित इंगवले यांनी माहिती दिली की, पाटस येथील अतुल काळे हा पत्नी जयश्री व मुलगी इंद्रायणी काळे यांना घेऊन रविवारी (ता. २६) दुपारी दुचाकीवरून महामार्गाने वरवंडकडे जात होता. त्यावेळी ढमालेवस्ती भागात विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या टेम्पोची व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील अतुल व त्याची कन्या इंद्रायणी यांचा जागीच मृत्यू झाला, तर जयश्री या गंभीर जखमी झाल्या.
टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला असून, अपघातग्रस्त टेंपो ताब्यात घेतला आहे, अशी माहिती पोलिस नाईक इंगवले यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहे.
७४०८३
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m84509 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..