भुईमूग काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुईमूग काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
भुईमूग काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

भुईमूग काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

sakal_logo
By

भोर, ता. २१ ः भोर तालुक्यात अद्याप पाऊस सुरू झाला नसलातरी पावसाची शक्यता गृहीत धरून शेतकरी उन्हाळी पिकांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतातील भुईमूग, बाजरी व कांद्याची पिके काढण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.

पावसाचा सर्वाधिक फटका भुईमूग आणि कांद्याच्या पिकाला बसणार आहे. पाऊस पडल्यावर भुईमुगाच्या शेतातील दाण्यांना कोंब येतात आणि पालाही कुजला जातो, तर कांदा सडू लागतो आणि दुर्गंधी येते. यामुळे शेतातील ही पिके काढून सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यासाठी बळीराजा धडपड करीत आहे. काही शेतकऱ्यांनी भुईमूग उपटून आहे तसा सुरक्षीत जागी आणून ठेवला आहे. तेथे आपल्या वेळेनुसार शेंगांची तोडणी करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी भुईमूग उपटल्यानंतर शेतातच तोडणी सुरु केली आहे. बाजरीची कणसेही तोडण्याची धावपळ सुरु आहे. शेतात काम करण्यासाठी मजूरही मिळत नसल्यामुळे जमेल त्या व्यक्तींच्या मदतीने शेतकरी शेतात काम करण्यात व्यस्त आहेत. सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे मुले-मुलीही शेतात काम करू लागली आहेत. याशिवाय धूळवाफेवर करण्यात येणारी भाताची पेरणीदेखील लगबग सुरु आहे.
PNE22S65652

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22r04579 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..