वैष्णवांची गैरसोय टाळण्यासाठी पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैष्णवांची गैरसोय टाळण्यासाठी पाहणी
वैष्णवांची गैरसोय टाळण्यासाठी पाहणी

वैष्णवांची गैरसोय टाळण्यासाठी पाहणी

sakal_logo
By

वाल्हे, ता. २१ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज वाल्हे (ता. पुरंदर) येथील पालखी तळाची पाहणी केली. पालखीतळाच्या इतर कामांबाबत समाधान व्यक्त करताना पालखीतळावर येण्यासाठी दुसऱ्या पर्यायी मार्गाच्या कामाच्या पुर्णत्वाबाबत मात्र त्यांनी साशंकता व्यक्त केली.
येत्या २७ जुलै रोजी माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी वाल्हे (ता. पुरंदर) येथे विसावणार आहे. पालखी सोहळ्यातील वैष्णवांची गैरसोय होऊ नये यासाठी पालखीतळ परिसराची पाहणी करण्यात आली.
यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीने पालखीतळावर कायमस्वरूपी झेंडा उभारण्यासाठी वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले यांच्याकडे पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी झेंडा सुपूर्द केला.
याप्रसंगी मारुती कोकाटे, बांधकाम विभागाचे महेंद्र पाटील, भाऊमहाराज गोसावी यांसह दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, सुनील पवार, संदीप चव्हाण, नीलेश अवसरमोल, प्रवीण कुमठेकर, संदेश पवार, संतोष गिरमे, सूर्यकांत भुजबळ आदि उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले यांनी आभार मानले.

निधीची कमतरता
पालखी सोहळ्यादरम्यान वैष्णवांसाठी करण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी शासनाकडून दरवर्षी निधी दिला जातो. मात्र, दोन वर्षापूर्वी वाल्हे ग्रामपंचायतीला कोणताही निधी उपलब्ध झाला नव्हता. वैष्णवांच्या सोईसुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची उणीव न राहण्यासाठी संबंधित प्रशासनाने पालखी सोहळा येण्यापूर्वी ग्रामपंचायतीला निधी द्यावा, अशी आग्रही मागणी सरपंच खवले यांनी उपस्थितांसमोर केली. दरम्यान, निधीच्या मागणीच्या पूर्ततेबाबत पाठपुरावा करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22r04614 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..