विद्युत रोहित्राच्या स्फोटात वाल्ह्यात फळबाग, ऊस खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत रोहित्राच्या स्फोटात 
वाल्ह्यात फळबाग, ऊस खाक
विद्युत रोहित्राच्या स्फोटात वाल्ह्यात फळबाग, ऊस खाक

विद्युत रोहित्राच्या स्फोटात वाल्ह्यात फळबाग, ऊस खाक

sakal_logo
By

वाल्हे, ता. २३ : वाल्हे (ता. पुरंदर) मधलामळा येथे आज दुपारी विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या प्रचंड आगीत येथील आंबा, सीताफळ बागेसोबतच चार ते पाच महिन्याचा ऊस देखील भक्ष्यस्थानी पडला. शेतातील महिला व युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधामुळे उर्वरित पिके व फळबागा वाचविण्यात यश आले.
मधलामळा येथे रोहित्राच्या स्फोटामुळे लागलेल्या प्रचंड आगीमुळे मदन भुजबळ यांच्या शेतातील तीस ते पस्तीस आंब्याची तर सीताफळाची जवळपास तेवढीच झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्याचबरोबर शेजारील तुषार भुजबळ यांच्या शेतातील चार ते पाच महिन्यांचा ऊस देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. भर दुपारी कडाक्याचे ऊन आणि त्यातच बेभान सुटलेल्या वाऱ्यामुळे विद्युत रोहित्राखाली असलेल्या वाळलेल्या गवताने व बांधावरील सरपनाने पेट घेतला. युवकांसह महिलांनी मिळेल ते भांडे व औषध फवारणीचे पंप पाठीवर घेऊन आग विझविण्याचा धाडसी प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली.
गावशिवारात असलेली विद्युत रोहित्र व शेतामध्ये लोंबकळणाऱ्या तारा याकडे मात्र महावितरणचे अधिकारी सोईस्कररीत्या डोळेझाक करत असल्याचा आरोप वाल्हे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सागर भुजबळ यांनी केला. आज झालेल्या अग्निकांडाची चौकशी व पंचनामा होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच अमोल खवले यांनी केली. आग विझविण्यासाठी सागर भुजबळ, तुषार भुजबळ, सचिन भुजबळ, साधू जाधव, श्रीराज भुजबळ, प्रवीण भुजबळ, संदेश भुजबळ, दीपक भुजबळ, रोहन भुजबळ, नंदा भुजबळ, जया भुजबळ, संध्या भुजबळ, शुभांगी भुजबळ, मीना भुजबळ आदींनी शर्थीचे प्रयत्न केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22r05300 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..