जेऊरग्राम सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर धुमाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेऊरग्राम सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर धुमाळ
जेऊरग्राम सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर धुमाळ

जेऊरग्राम सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर धुमाळ

sakal_logo
By

वाल्हे, ता. २६ : जेऊर (ता. पुरंदर) येथील जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर भिकोबा धुमाळ व उपाध्यक्षपदी रत्नकांत साधू तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकतीच जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा तेरा शून्य असा धुरळा उडवत आपल्या ताब्यातील सोसायटी राखण्यात यश मिळविले होते. दरम्यान बुधवारी जेऊर येथील जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. बागवान यांच्या देखरेखे खाली निवडी करण्यात आल्या. त्यात अध्यक्षपदासाठी धुमाळ यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी तांबे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने या दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी लक्ष्मण बडदरे, बाळू धुमाळ, दीपक धुमाळ, दत्तात्रेय धुमाळ, दिगंबर धुमाळ, अनिल गार्डी, संजय गायकवाड, बापूराव गायकवाड, गजानन देशपांडे, शुभांगी धुमाळ व वंदना चोरगे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22r06059 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top