राजगड निवडणुकीतील ९ अर्ज अपिलात वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगड निवडणुकीतील ९ अर्ज अपिलात वैध
राजगड निवडणुकीतील ९ अर्ज अपिलात वैध

राजगड निवडणुकीतील ९ अर्ज अपिलात वैध

sakal_logo
By

भोर, ता. १७ ः राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत अवैध ठरवलेले ९ अर्ज साखर आयुक्तांच्या प्रादेशिक सहसंचालकांनी वैध ठरविले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ११ उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने साखर आयुक्तांच्या प्रादेशिक सहसंचालकांकडे अपील केले होते. त्यावर सहसंचालकांकडून मंगळवारी (ता. १७) यावर निर्णय देण्यात आला. साखर आयुक्त कार्यालयात निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेच्या विरोधातील पहिली सुनावणी मंगळवारी (ता.१०) पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपली बाजू मांडली तर गुरुवारी (ता.१२) कॉँग्रेसकडून बाजू मांडण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (ता.१७) साखर आयुक्तांनी दिलेल्या निर्णयामुळे आता १७ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बुधवारी (ता.१८) अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. साखर आयुक्तांनी दत्तात्रेय पांगारे व सुरेश खुटवड यांचे छाननी प्रक्रियेतील अवैध केलेले अर्ज पुन्हा अवैध ठरविले आहेत. अपिलानंतर अर्ज वैध ठरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे ः विलास अमृतराव बांदल, अलका मालुसरे, मनोज निगडे, ज्ञानेश्वर पांडुरंग बागल, दिलीप महादेव रेणुसे, शिवाजी शहाजी बांदल, राजाराम दगडू कांबळे, राजेश गोविंद राऊत व रामचंद्र कुडले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22y11334 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top