विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या चित्रसंकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या चित्रसंकल्पना
विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या चित्रसंकल्पना

विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या चित्रसंकल्पना

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : कागदावर साकारणाऱ्या चित्रांतील रंगसंगती, रचना व आकृती कशी असावी, संकल्पचित्र, स्थिरचित्र, अक्षरलेखन, स्मरणचित्र कसे असावे, याबाबतचे मार्गदर्शन कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले.
‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या उपक्रमांतर्गत आयोजित शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट कार्यशाळेचे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व व महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेणू विद्यालयात केले होते. या कार्यशाळेत कलाशिक्षक रमेश गाढवे, बालाजी चौगुले यांनी स्मरण, संकल्प, अक्षरलेखन या विषयांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ अध्यक्ष अजित काळे, सचिव विश्‍वास काळे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन सुरेश काळे, बी. डी. काळे महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. मुकुंद काळे, प्राचार्य अनिल कळंबे, उपप्राचार्य पोपट भिटे, मुख्याध्यापिका मेरिफ्लोरा डिसोझा, रेखा आवारी, पर्यवेक्षक अनिल काळे, कलाशिक्षक संजय सोमवंशी, समीर मुजावर, संदीप सोमवंशी, स्मिता लांडे, कैलास जाधव, हुतात्मा बाबू गेणू विद्यालयाचे प्राचार्य गोरक्ष चिकणे, पर्यवेक्षक रोहिदास साळी, कलाशिक्षिका विनिता गाढवे, परविन शेख, गोरक्ष केदारी आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत रमेश गाढवे यांनी विविध प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना परीक्षेची पूर्वतयारी व रंगसंगती याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. बालाजी चौगुले यांनी विद्यार्थ्यांना स्मरणचित्र व अक्षर लेखन यावर मार्गदर्शन केले. ‘सकाळ एनआयई’चे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी कार्यशाळांचे संयोजन केले.

मुख्याध्यापकांना आवाहन
सकाळ एनआयई या विद्यार्थिप्रिय उपक्रमाची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी सभासद नोंदणी सुरू झाली असून, आपल्या विद्यालयात हा उपक्रम राबवू इच्छिणाऱ्या मुख्याध्यापकांनी विशाल सराफ यांच्याशी ९९२२९१३४७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

PNE22S93041

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22y27791 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..