आयुर्वेदाने दिले कर्करुग्णाला जीवनदान महिलेची डीएलबीसीएलवर मात ः आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत उमटली मोहोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुर्वेदाने दिले कर्करुग्णाला जीवनदान

महिलेची डीएलबीसीएलवर मात ः आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत उमटली मोहोर
आयुर्वेदाने दिले कर्करुग्णाला जीवनदान महिलेची डीएलबीसीएलवर मात ः आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत उमटली मोहोर

आयुर्वेदाने दिले कर्करुग्णाला जीवनदान महिलेची डीएलबीसीएलवर मात ः आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत उमटली मोहोर

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : ‘डिफ्युज लार्ज बी सेल लिम्फोमा’ (डीएलबीसीएल) या गंभीर स्वरूपाच्या कर्करोगावर आयुर्वेदाची मात्रा प्रभावी ठरली आहे. त्यातून ५१ वर्षांची महिला फक्त आयुर्वेदिक उपचारातून कर्करोगमुक्त झाल्याची मोहोर आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत उमटविली.

आयुर्वेदाला पर्यायी उपचार पद्धती मानली जाते. कर्करोगासारख्या असाध्य आजारांवर आयुर्वेदातील वनौषधी प्रभावी ठरू शकतात, असा विश्वास आता व्यक्त होत आहे. त्याला निमित्त हे पुण्यातील ‘रसायू कॅन्सर क्लिनिक’मधील वैद्य योगेश बेंडाळे यांचा इंग्लंडमधील ‘क्लिनिकल केस रिपोर्ट्स’ या मानांकित आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेला शोधनिबंध ठरला आहे.
‘डीएलबीसीएल’ हा कर्करोग ‘नॉन-हॉचकिंन्स लिम्फोमा’ या नावाने ओळखला जातो. या गंभीर कर्करोगाचे वेळीच अचूक निदान आणि त्यावर प्रभावी उपचार करणे, हाच रुग्णाचे प्राण वाचविण्याचा परिणामकारक मार्ग असतो. अशा कर्करोग झालेल्या ५१ वर्षांच्या महिलेवर फक्त आयुर्वेदिक उपचार केले, अशी माहिती वैद्य बेंडाळे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘या महिलेवर उपचार करताना कर्करोगाच्या गाठीचा आकार कमी करणे, हा उद्देश ठेवला. त्यातून आयुष्यमान वाढविण्यात यश आले. आयुर्वेदातील रसायन चिकित्सेतून कर्करोगावर योग्य परिणाम होतो आहे का, ही पद्धत सुरक्षित ठरत आहे का, हे नियमित रक्त तपासण्यांमधून निश्चित करण्यात येत होते. हे उपचार दोन वर्षे सुरू होते. मात्र, या प्रकारच्या ४० टक्के रुग्णांचा उपचार सुरू असताना पाच वर्षांपर्यंत मृत्यू होतो. त्यामुळे या आयुर्वेदातील रसायन चिकित्सेचा परिणाम नेमकेपणाने अभ्यासण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्राचा आधार घेतला. त्यासाठी रुग्णाचा पेट स्कॅन केला.”


काय आहे रसायन चिकित्सा
आयुर्वेद शास्त्रात नमूद केलेल्या आठ शाखांपैकी रसायन चिकित्सा ही एक आहे. या माध्यमातून संभाव्य रोगांवर उपचार करता येतो. ही चिकित्सा पद्धत औषध केंद्रित नसून रुग्णकेंद्रीत आहे. त्यामुळे रुग्णाच्या प्रत्येक पेशीवर या औषधाचा चांगला परिणाम झालेला दिसतो. यात रोगप्रतिकारक शक्तीचे संतुलनावर विशेष लक्ष दिले जाते. शरीरातील पेशी त्यांचे नियमित कार्य सुरळीत करू शकतील, यासाठी रसायन कल्पची निवड महत्त्वाची ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता
आयुर्वेदिक रसायन चिकित्सा पद्धतीने महिला रुग्णावर केलेल्या औषधोपचाराचा सविस्तर नोंदी ठेवण्यात आल्या. त्या आधारावर हा केस स्टडी इंग्लंडमधील क्लिनिकल रिपोर्ट्स या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला. जागतिक पातळीवरील कर्करोग तज्ज्ञ या केसचा अभ्यास करतात. त्यानंतरच हा शोधनिबंध नियतकालिकात प्रसिद्ध होतो.

‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणित निकषांच्या आधारावर केलेल्या विश्लेषणातून आयुर्वेदातील रसायन औषधे घेतल्यानंतरही रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा चांगला राहिला असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. पॅट स्कॅनच्या तपासणीत रुग्णाच्या शरीरात एकही कर्करोगाची गाठ रुग्णाच्या शरीरात नसल्याचे दिसले. या उपचारांचा रुग्णाच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम झालेला नसल्याचेही विविध तपासण्यांमधून स्पष्ट झाले. जीवनमानाचा दर्जा चांगला राहाणे आणि औषधांचा दुष्परिणाम न दिसणे यातून रसायन चिकित्सा रुग्णासाठी सुरक्षित व उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट होत आहे.’’
-योगेश बेंडाळे, वैद्य

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22y28179 Txt Maval

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..