वरवंड, पाटस परिसरात अकरा गायींना लम्पीची बाधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरवंड, पाटस परिसरात 
अकरा गायींना लम्पीची बाधा
वरवंड, पाटस परिसरात अकरा गायींना लम्पीची बाधा

वरवंड, पाटस परिसरात अकरा गायींना लम्पीची बाधा

sakal_logo
By

पाटस, ता. २३ : दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वरवंड व पाटस परिसरात एकूण अकरा संकरित गायींना लम्पी स्किन आजाराची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये वरवंडमधील चार तर पाटस परिसरातील सात गायींचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पशुधन पर्यवेक्षक ज्ञानेश्वर फरगडे व सहायक पशुधन पर्यवेक्षक गणपत गावडे यांनी केले.

सध्या तालुक्यात लम्पीबाधित जनावरांच्या संख्येचा आलेख वाढत चालला आहे. त्यामुळे विशेषतः दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्था निर्माण झाली. वरवंड परिसरात अंदाजे अडीच हजार जनावरांची संख्या आहे. मात्र, लम्पी आजाराने परिसरात शिरकाव केला आहे. सध्या चार गायींना लम्पी संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळून आली आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. ज्ञानेश्वर फरगडे यांनी सांगितले. तसेच लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण जोमात सुरू आहे. परिसरातील जवळपास दोन हजार चारशे जनावरांचे लसीकरण झाले असल्याचे डॉ. फरगडे यांनी सांगितले.

तसेच पाटस परिसरात जनावरांची अंदाजे दोन ते अडीच हजार जनावरांची संख्या आहे. यामध्ये संकरित गायींची संख्या लक्षणीय आहे. सध्या पाटस परिसरात सात संकरित गायींना लम्पी आजाराची बाधा झाल्याचे समोर आले आहे. गायींच्या त्वचेवर विशिष्ठ आकराच्या गाठी आल्या आहेत. माहिती मिळताच सहायक पशुधन अधिकारी गणपत गावडे यांनी संबंधित गायींची पाहणी करून त्यावर औषधोपचार केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाटस परिसरातील दीड हजार जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लस दिली असल्याचे गावडे यांनी सांगितले.

दरम्यान, पशुपालकांनी गोठ्याची व गुरांची स्वच्छता ठेवावी. गोठ्यात डास व माशांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी विशिष्ट उपाययोजना कराव्यात. गुरांमध्ये ताप येणे, डोळ्यांतून पाणी येणे, चारा खाणे बंद होणे, अंगावर गाठी आदी लक्षणे आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश जाधव यांनी केले.

pts23p1

पाटस (ता. दौंड) : लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर गुरांचे लसीकरण करताना डॉ. गणपत गावडे.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22y28184 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..