राज्यात पावसासाठी पोषक हवामान

राज्यात पावसासाठी पोषक हवामान

पुणे, ता. २४ ः राज्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती होत तुरळक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान होत आहे. अरबी समुद्रातून होत असलेल्या बाष्प पुरवठ्यामुळे ही स्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे पुण्यात ही अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
मंगळवारी (ता. २४) शहरात १२.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानात चढ-उतार अशीच कायम राहणार असून येत्या रविवारपर्यंत (ता. २९) पुणे व परिसरात अंशतः ढगाळ वातावरण कायम राहू शकते. त्यामुळे आता शहरातून थंडीने पळ काढला आहे.
राज्यात मंगळवारी नीचांकी तापमानाची नोंद नाशिक येथे ११ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर राज्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमान १४ अंशांच्या पुढे कायम होते. सध्या नैॡत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून नैॡत्य उत्तर प्रदेशापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच अरबी समुद्रातून होणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत आहे. त्याचबरोबर पावसाला पोषक हवामान झाले आहे. यामुळे बुधवारी (ता. २५) जळगाव, सातारा, नाशिक, सिंधुदुर्ग कोल्हापूर बुलडाणा, अमरावती आदी जिल्‍ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com