शहरातील ७७ सहकार संस्थांच्या निवडणुका पूर्ण

शहरातील ७७ सहकार संस्थांच्या निवडणुका पूर्ण

पिंपरी, ता. ७ : कोरोना व इतर कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या सहकार संस्थांच्या निवडणुकांचे पडघम सुरु आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात चौथ्या टप्प्यातील १४६ पैकी ७७ संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पात्र ४० संस्थांच्या निवडणुका सध्या प्रक्रियेत आहेत. त्यापैकी २९ संस्थांची नोंदणी उपनिबंधक सहकारी कार्यालयाकडून कार्यवाही करून रद्द करण्यात आली आहे.

सहकार संस्था अंतर्गत टप्पा क्रमांक एक, दोन, तीन पूर्ण झाले आहेत. सध्या चौथा टप्पा पूर्ण होत आला आहे. राज्य निवडणुका प्राधिकरणाकडून आलेल्या आदेशानंतर लवकरच पाचव्या टप्प्यातील निवडणुका सुरु होणार आहेत. यामध्ये गृहनिर्माण संस्था, नागरी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, ग्राहक पतसंस्था, औद्योगिक संस्था, स्वयंम रोजगार संस्था, मजूर वर्ग संस्थांचा समावेश आहे.

उपनिबंधक कार्यालयाद्वारे प्रारूप यादी प्रसिद्ध होऊन अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्राधिकरणाला नावे पाठविली गेली होती. त्यानुसार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम मंजूर करून कार्यक्रम याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यातील काही निवडी बिनविरोध झाल्या आहेत. त्यातूनही अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांची चुरस सर्वाधिक आहेत.

टप्पा क्रमांक एक मधील कोविड काळात मे २०१९ अखेर स्थगित केलेल्या क वर्गातील सहकार संस्थांच्या, टप्पा क्रमांक दोन मधील ३१ डिसेंबर २०१९ अखेरच्या क व ड वर्गातील ४८ सहकार संस्थांच्या व टप्पा क्रमांक तीनमधील ३१ मार्च २०२० अखेरच्या ब, क व ड वर्गातील १० संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. तिसरा टप्पा तीन महिन्याच्या कालावधीतच पार पडला. टप्पा क्रमांक चारमधील ३१ मार्च २०२१ अखेरच्या ब, क व ड वर्गातील ७५ संस्थांपैकी ४० संस्थेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात सुरु आहेत. त्यापैकी क दर्जाच्या २९ संस्थांच्या मतदार याद्या वेळेत न आल्याने तसेच, ऑडिट न झाल्याने कार्यवाही करुन नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

-कोट-
दोन ते तीन आठवड्यात पुढील टप्प्यातील निवडणुका कळतील. महसूल विभाग व जिल्हा निवडणूक एकत्रितपणे असल्याने मनुष्यबळ कमी पडते. भरती लवकरच होइल. मतदार यादी वेळेत दिलेली नाही, अशा संस्थांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.
- नागनाथ कंजेरी, उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर ३,
---
शहरातील सहकार संस्थांच्या निवडणुका आकडेवारी

वर्ग संस्था निवडणुका
क ११९
ब १७
ड १०
एकूण १४६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com