Fri, June 9, 2023

शहरात आजपासून २२ केंद्रांवर बारावीची परीक्षा
शहरात आजपासून २२ केंद्रांवर बारावीची परीक्षा
Published on : 20 February 2023, 2:37 am
पिंपरी, ता. २० ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. यासाठी शहरातील २२ केंद्रांवर २३ हजार विद्यार्थी परीक्षा देतील. पहिला विषय इंग्रजी आहे. दरम्यान, सोमवारी सर्व केंद्रांवर बैठक क्रमांकासह, विद्यार्थ्यांसाठीचे विविध सूचना फलक लिहिण्याचे काम झाले. परिक्षेची सर्व तयारी झाली आहे. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना आसन व्यवस्था, खोली क्रमांक कळविण्यात आले आहेत.
फोटो - २६०२५