डॉ. सुमेध मगर उभारणार 
बारामतीत स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी

डॉ. सुमेध मगर उभारणार बारामतीत स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी

डॉ. सुमेध मगर उभारणार
बारामतीत स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी

बारामतीत एक नवीन संकल्पना अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करणारे डॉ. सुमेध मगर हे विजयादशमीच्या मुहूर्तावर बारामतीत वैद्यकीय व्यवसायाचा श्रीगणेशा करीत आहेत. बारामती पंचक्रोशीतील खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून आगामी काळात ते बारामतीत एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारणार आहेत. त्या दृष्टीने त्यांची वेगाने वाटचाल सुरु आहे. त्यांच्या या प्रयत्नांचा हा धावता आढावा.
......
मराठी मुलांमधील गुणवत्ता ही अनेकदा समोर येते. ग्रामीण भागातून पुढे येणारी मुले आपल्या ज्ञानाच्या जोरावर उच्च गुणवत्ता प्राप्त करतात. डॉ. सुमेध हेमंत मगर यांचाही उल्लेख याच अनुषंगाने करावा लागेल. आपल्या ज्ञानाच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये मास्टर्ससाठी प्रवेश मिळाला आहे.

डॉ. सुमेध यांनी कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. उत्तीर्ण केले. त्यानंतर डॉ. डी. वाय पाटील महाविद्यालयातून त्यांनी एम.एस. (ऑर्थोपेडिक्स) ही पदवी संपादन केली. ही पदवी संपादन करताना त्यांनी महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशनच्या वतीने दिले जाणारे कै. पदमश्री वेदसिन्हा मारवाह रिसर्च ॲवॉर्ड प्राप्त केले.

डॉ. सुमेध यांना स्पोर्ट्स मेडिसिन, एक्सरसाईज आणि हेल्थ ऑफ युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये मास्टर्ससाठी प्रवेश मिळाला. हे विद्यापीठ जगातील सर्वोत्तम वैद्यकीय विद्यापीठांपैकी एक आहे. वैद्यकीय विद्यापीठांमध्ये जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकावर, लंडनमधील मेडिसिन क्षेत्रातील प्रथम क्रमांकाची; तर इंग्लंडमधील वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या बाबतीतीलही प्रथम क्रमांकाची ही संस्था समजली जाते. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तब्बल २९ जणांना आतापर्यंत नोबेल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. सुमेध मगर हे सातारा येथील सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. एक उत्तम खेळाडू तसेच जलतरणामध्ये सुवर्ण व रौप्य पदक विजेता खेळाडू म्हणूनही त्यांचा नावलौकीक आहे. अखिल भारतीय इंटरमेडिकल स्पर्धांमध्ये राष्ट्रीय जलतरण चॅम्पियन, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीचे सुवर्ण आणि रौप्य पदक विजेता म्हणूनही त्याचा उल्लेख करता येईल. डॉ. सुमेध यांनी अमेरिकेतील मास्टर्स इन स्पोर्ट्स मेडिसिन एक्सरसाईज अँड हेल्थ ही पदवी प्राप्त केलेली आहे. अशा प्रकारची पदवी प्राप्त करणारे ते पंचक्रोशीतील पहिलेच युवा डॉक्टर ठरले आहेत.


डॉ. हेमंत व डॉ. मीरा मगर यांचे डॉ. सुमेध हे सुपुत्र आहेत. डॉ. हेमंत मगर हे राष्ट्रीय स्तरावर नामांकित अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून नावाजलेले आहेत. बारामती व फलटण या दोन ठिकाणी ते सध्या वैद्यकीय व्यवसाय करतात. पुण्यातील बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये मानद प्राध्यापक, तसेच रूबी हॉल क्लिनिक व ओयस्टर पर्ल हॉस्पिटलमध्ये ते कन्सल्टंट म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचे काका विवेक मगर हे अमेरिकेतील शिकागो येथे कार्यरत आहेत.

बारामतीत तीन दिवस उपलब्ध
डॉ. सुमेध मगर हे बारामतीतील त्यांच्या जॉइंट अँड स्पाईन क्लिनिकमध्ये सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवशी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. ज्या रुग्णांना विशेषतः खेळाडूंना काही त्रास असेल, ते डॉ. सुमेध यांच्याशी या काळात संपर्क साधू शकतात.

दृष्टीक्षेपात प्रकल्प
• ग्रामीण भागात खेळाविषयक संस्थेची उणीव विचारात घेत हा प्रकल्प उभारणार.
• ग्रामीण भागातील खेळाडूंना परिपूर्ण मार्गदर्शन व वैद्यकीय सल्लाही देणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com