आमदार लक्ष्मण जगताप यांना विजय समर्पित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार लक्ष्मण जगताप यांना विजय समर्पित
आमदार लक्ष्मण जगताप यांना विजय समर्पित

आमदार लक्ष्मण जगताप यांना विजय समर्पित

sakal_logo
By

पिंपरी ः रात्रंदिवस मेहनत घेणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या एकत्रित लढ्याचा हा विजय आहे. शहराच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा विजय आम्ही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडकरांनी विकासाच्या मुद्द्यांवर मतदान केले. जगताप यांनी शहराच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्याचे स्मरण इथल्या भूमिपुत्रांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी ठेवले. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यानंतरसुद्धा मतदारांनी भाजप-शिवसेना महायुतीवर विश्वास दाखवला. या विजयाबाबत शहर भाजप आनंदोत्सव साजरा करणार नाही. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. त्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला नाही. निवडणुका येतील आणि जातील. पण, एखाद्या व्यक्तीने आयुष्यातील ३० वर्षे शहराची सेवा केल्यानंतर त्यांच्या निधनाने आपण संवेदनशीलता दाखवत नसेल, तर भावी पिढी आपल्याकडून काय आदर्श घेईल?’’