विजय साजरा नसल्याने फुल बाजाराला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजय साजरा नसल्याने फुल बाजाराला फटका
विजय साजरा नसल्याने फुल बाजाराला फटका

विजय साजरा नसल्याने फुल बाजाराला फटका

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : मोठा विजय मिळवूनही कोणताही जल्लोष करायचा नाही, असा निर्णय भाजप घेतला. मात्र, यामुळे फूलबाजारात होवू घातलेली विक्रमी उलाढाल गुरुवारी सकाळनंतर ठप्प झाली. सोशल मीडियावर श्रद्धांजलीपर पोस्ट फिरत असल्याने विक्रेते अगोदरच सावध झाले होते.

निवडणूक कालावधीमध्ये गुलाब व गुलछडीच्या हारांना सर्वाधिक मागणी असते. निकालानंतर एका फूल विक्रेत्याकडून कमीत-कमी ३० हजार रुपयांच्या फुलांची विक्री होईल अपेक्षित होते. असे एकूण विक्रेते २० ते २२ आहेत. त्यामुळे तीन लाखांची किरकोळ फुलांची विक्री एका दिवसांत होईल असे गृहीत धरले होते. पुष्पगुच्छांची देखील विक्री झाली नाही. केवळ दिवंगत आमदारांच्या स्मृतीस्थळावर आरास करण्यासाठी गुलाब व पाकळ्यांचा वापर झाला. एकूणच मोठी उलाढाल थांबली, असे विक्रेत्यांनी सांगितले.
--
निवडणुकीत फुलांचा खप मोठ्या प्रमाणात होतो. गुलालासह फुलांची उधळण व पुष्पहारांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. दोन ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या हारांची सर्वाधिक विक्री होते. १० ते ३० हजार रुपयांच्या जम्बो हारांना मागणी जास्त असते. किमान अडीच ते तीन लाख रुपयांची उलाढाल होते.
- गणेश आहेर, फूलबाजार, विक्रेते