Sun, May 28, 2023

अग्निशामक यंत्रणेचा अभाव
अग्निशामक यंत्रणेचा अभाव
Published on : 3 March 2023, 4:08 am
अग्निशामक यंत्रणेचा अभाव
दौंड रेल्वे स्थानकाच्या सहा फलाटांवर पाण्याची सोय असल्याने आग लागल्यास प्रतिबंध करणे शक्य आहे. परंतु, साइडिंगला लावलेल्या रॅकची आग आटोक्यात आण्यासाठी अत्यंत तोकडी उपकरणे असल्याने रेल्वे प्रशासनाच्या अग्निप्रतिबंधक उपाययोजनांच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. दौंड येथून डिझेल, खाद्यतेल, कोळसा, सिमेंट, साखर, मळी, खते, आदींची मालवाहतूक होते. त्यामुळे प्रवासी, रेल्वे कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सक्षम यंत्रणेची आवश्यकता आहे.