Thur, June 1, 2023

भोसरीतील शिबिरात ३१० जणांचे रक्तदान
भोसरीतील शिबिरात ३१० जणांचे रक्तदान
Published on : 4 March 2023, 3:09 am
पिंपरी ः श्री शंकर महाराज सेवा मंडळ चिंचवड आणि भोसरी येथील प्लेट मास्टर्स आयोजित शिबिरामध्ये ३१० जणांनी रक्तदान केले. यावेळी रामेश्वर राठी, सूर्यकांत राठी, भगवान राठी, संचालक श्रीनिवास राठी, दिलीप राठी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश वैद्य, जागृती अंध मुलींची शाळेच्या संचालिका सकीना बेदी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अर्चना वाशीकर यांनी केले. आभार सिध्दार्थ सेठिया यांनी मानले.