Wed, June 7, 2023

वाकडमध्ये मॉल परिसरात टोळक्याने माजवली दहशत
वाकडमध्ये मॉल परिसरात टोळक्याने माजवली दहशत
Published on : 4 March 2023, 2:47 am
पिंपरी, ता. ४ : वाकडे येथील फिनिक्स मॉलमध्ये एका टोळक्याने दोन कामगारांवर कोयत्याने वार करत दहशत माजवली. फिर्यादी लोकेश विनोद लखन (रा. सुरती मोहल्ला, खडकी) मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ उभे होते. यावेळी तोंडाला मास्क बांधून आलेल्या सात जणांच्या टोळक्याने टेबलवर कोयता मारून सुरक्षारक्षक राजकिशोर यांना मारहाण केली. तसेच फिर्यादीला हाताने मारहाण करीत कोयता हवेत फिरवून माथाडी कामगार अनिल कांबळे व प्रवीण पारखी यांच्यावर वार केले. खिशातील दहा हजाराची रोकड लुटून दहशत माजवून टोळके पसार झाले.