वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनाच्या धडकेत 
हरणाचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू

sakal_logo
By

पाटस, ता. ५ ः पाटस-बारामती पालखी मार्गावर रोटी (ता. दौंड) हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका हरणाचा मृत्यू झाला.
दौंड तालुक्यातील पाटस- बारामती पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वनक्षेत्र आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी इकडून तिकडे ये-जा करताना रस्त्यावर येतात. मागील आठवड्यात वाहनाच्या धडकेत एका मादी जातीच्या हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा पहावयास मिळाली आहे. शुक्रवारी (ता. ३) रात्री रोटी हद्दीत आलेल्या हरणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये हरण गंभीर जखमी झाले. याबाबत नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनविभागाच्या वनरक्षक पद्मिनी कांबळे, वनकर्मचारी बाबासाहेब कोकरे, रमेश कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वन्यजीव बचाव पथकाला पाचारण करून हरणाला उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले. मात्र, हरणाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.