Wed, May 31, 2023

खड्डेमुक्त होळी साजरी करा ः जोशी
खड्डेमुक्त होळी साजरी करा ः जोशी
Published on : 5 March 2023, 2:34 am
पुणे ः खड्डेमुक्त होळी ही संकल्पना नागरिकांनी आणि मंडळांनी राबवावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रसिक अरुण जोशी यांनी केले.
होळीचा सण भारतीय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आपले पारंपारिक सण आपण साजरे केलेच पाहिजेत. परंतु ते साजरे करताना होळीमुळे डांबरी रस्त्यांवर जे खड्डे पडतात ते पडू नाहीत म्हणून होळी करण्यापूर्वी त्याठिकाणी मातीचा थर, विटांचा थर लावून त्यावर होळी करावी. जेणेकरून आपण जे कररूपी पैसे देतो आणि त्या पैशातून जो रस्ता तयार झालेला असतो. त्यावर खड्डे पडणार नाहीत. तसेच तो रस्ता सुरक्षित राहील, असे जोशी म्हणाले.