
महिला दिन पुरवणी - दातांवरील आधुनिक तंत्रशुद्ध उपचारतज्ज्ञ
‘डेंटल एक्स्पर्ट’ डॉ. मंजूषा इंगळे
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या ३३ वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक उपकरणांनी दंतोपचार डेंटल डॉ. मंजूषा इंगळे करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान व कौशल्याचा उपयोग करत ७२ तासांत फिक्स दात बसविणारे आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा देणारे ‘डेंटल क्लिनिक’ असा नावलौकिक डॉ. इंगळे डेंटल क्लिनिक या दवाखान्याने मिळविला आहे.
संत तुकारामनगर येथे डॉ. इंगळे डेंटल क्लिनिकची शाखा ही ‘डेंटल एक्स्पर्ट’ या नावाने सुरू आहे. दरम्यान, डॉ. इंगळे डेंटल क्लिनिकची सुरवात १९९० मध्ये पिंपरीतील साई चौक येथून झाली. यासाठी डॉ. मंजूषा यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातून वयाच्या ४७ व्या वर्षी पदव्युत्तर पदवी संपादन केली. मंजूषा यांनी दक्षिण कोरिया आणि युरोपमधील बर्न येथे जाऊन आधुनिक उपचार पद्धती प्राप्त केली. दातांच्या प्रतिबंधात्मक उपचारांसाठी ‘दंत सुरक्षा योजना’ सुरू केली असून कमी खर्चात उपचार होतात. अजमेरा कॉलनी, मोशी प्राधिकरण, संत तुकारामनगर पिंपरी अशा शाखा आहेत. या कार्यात त्यांची कन्या डॉ. संयुक्ता इंगळे यांची मोलाची साथ देत आहे.
इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केले. यात दातांची कीड आणि त्यामुळे होणारे आजार, हिरड्याचे आजार, रूट कॅनॉल, डेंटल इम्प्लांट्स, वेडेवाकडे दात सरळ करणे, अलायनर उपचार केले जातात. प्रामुख्याने डेंटल इम्प्लांट्सवर फिक्स दात बसवणे, अक्कल दाढा काढणे, कर्करोग आणि कर्करोग पूर्व लक्षणे यांचे विविध उपचार देतात. दातांची कवळी बनवणे व इम्प्लांटच्या साह्याने ७२ तासांमध्ये संपूर्ण फिक्स दात बनविण्यात डॉ. इंगळे डेंटल इन्स्टिट्यूटचा हातखंडा आहे.
संपर्क 9822117381/9503627981/9175447381