महिला दिन पुरवणी - डॉ. निलिमा पवार- गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिन पुरवणी - डॉ. निलिमा पवार- गायकवाड
महिला दिन पुरवणी - डॉ. निलिमा पवार- गायकवाड

महिला दिन पुरवणी - डॉ. निलिमा पवार- गायकवाड

sakal_logo
By

सामाजिक वसा

जनरल प्रॅक्टिशनर डॉ. नीलिमा पवार- गायकवाड
लहान मुलांचे आजार असो कि महिलांच्या आरोग्य समस्‍या सोडविण्यासाठी पिंपरीतील अजमेरा-मासुळकर कॉलनीतील डॉ. नीलिमा पवार- गायकवाड प्रसिद्ध आहेत. विघ्नहर्ता क्लिनिकमध्‍ये १५ वर्षापासून त्या ‘जनरल प्रॅक्टिशनर’ म्हणून सर्व रोग निदान चिकित्सा व सल्ला देत आहेत. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक वसा जोपासला आहे.
डॉक्टर नीलिमा गायकवाड ह्यांचा अहमदनगर-श्रीरामपूर येथे झाला. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती. अभ्यासात हुशार असल्याने त्‍यांनी शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि बीएचएमएसकरिता काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज प्रवेश मिळविला. २००७ मध्ये वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर नीलिमा यांनी ‘विघ्नहर्ता क्लिनिक’ सुरू केले. नाममात्र फी घेऊन उत्तम उपचार ही डॉ. नीलिमा त्यांची खासियत आहे. त्यांनी पुण्‍यातील रूबीहॉल हॉस्पिटलमधून ‘इएमएस’ इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’ याचे देखील प्रशिक्षण घेतले आहे. शेजारीच विघ्नहर्ता हॉस्पिटल सुरू केले. तेथे दहा बेडची सोय आहे. रुग्णांना सलाईनची सुविधा आहे. ‘डे केअर’मध्ये रुग्णाला दाखल करू शकतो. लहान मुलांचे आजार व लसीकरण, स्रीरोग चिकित्सा व सल्ला, वजन कमी करणे, आहार विषयक मार्गदर्शन, गर्भधारणा तपासणी, जुनाट रोगांवर होमिओपॅथिक व आयुर्वेदिक उपचार देत आहेत. १५ वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्या अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, म्हाडा कॉलनी, मोरवाडी या परिसरात सुपरिचित आहेत. पती डॉ. रूपेश पवार यांची मोलाची सहकार्य आणि सासू- सासऱ्यांचे साथ लाभली आहे. अनेक मोफत आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक ठसा उमटवला आहे. त्यासाठी बंधू नीलेश गायकवाड यांचे सहकार्य लाभत आहे. स्वतःच्या बाळांची जबाबदारी सांभाळून त्या वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.