वन्यजीवांसाठी टॅंकरद्वारे सोडले पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन्यजीवांसाठी टॅंकरद्वारे सोडले पाणी
वन्यजीवांसाठी टॅंकरद्वारे सोडले पाणी

वन्यजीवांसाठी टॅंकरद्वारे सोडले पाणी

sakal_logo
By

वरवंड, ता. १३ ः जागतिक महिला दिनानिमित्त वरवंड (ता. दौंड) येथील भ्रमंती बचत गटाच्या महिलांनी वन्यजीवांसाठी मदतीचा हात पुढे करत आदर्शवत उपक्रम राबविला. महिलांनी वन्यजीवांसाठी पाणवठ्यात आठ हजार लिटर पाणी सोडले. तसेच पिंपळाचे रोप लावले.
देऊळगावगाडा वनक्षेत्रात कोल्हा, लांडगा, तरस, चिंकारा आदी वन्यप्राण्यांची लक्षणीय संख्या आहे. याशिवाय विविध जातीच्या पक्षांची संख्या आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने वन्यजीवांना पाण्याची नितांत गरज भेडसावते. या पार्श्‍वभूमीवर वरवंड येथील भ्रमंती बचत गटाच्या महिलांनी वन्यजीवांसाठी मदतीचा हात पुढे करून महिला दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी वनअधिकारी शीतल खेंडके, वनरक्षक शीतल मेरगळ, वंदना दिवेकर, तृप्ती शेळके, राणी कुंडले, रेश्मा सातपुते, सुनीता तावरे, लता खोमणे, दीपाली शेळके, अक्षदा सातपुते आदी उपस्थित होते.

29663