मॉडर्न कॉलेज फार्मसीमध्ये आज ‘यिन’चे अधिवेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉडर्न कॉलेज फार्मसीमध्ये आज ‘यिन’चे अधिवेशन
मॉडर्न कॉलेज फार्मसीमध्ये आज ‘यिन’चे अधिवेशन

मॉडर्न कॉलेज फार्मसीमध्ये आज ‘यिन’चे अधिवेशन

sakal_logo
By

पिंपरी, ता.१४ ः सकाळ माध्यम समुहाच्या यंग इन्‍स्पिरेटर्स नेटवर्कचे (यिन) पिंपरी-चिंचवडचे अधिवेशन उद्या (बुधवार) आहे. निगडी येथील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी येथे सकाळी अकरा वाजता महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घघाटन व सायंकाळी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या उपस्थितीत समारोप होणारा आहे.

अधिवेशनासाठी महाविद्यालयांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सत्ताधारी व विरोधी पक्ष असतील. वर्षभरात काय उपक्रम राबवणार आहेत, याचा अभ्यास करून सर्व अध्यक्ष मुद्दे मांडतील. दुपारच्या सत्रात प्रत्येक पक्षातील युवा नेते व पिंपरी-चिंचवड विधानसभेचे आमदार उपस्थित राहतील. युवा नेत्यांची मुलाखत प्रा. रोहित गुरव घेणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौधरी, उपकार्यवाह निवेदिता एकबोटे प्रमुख उपस्थित असतील.