
पाटसच्या सरपंचपदी रंजना पोळेकर बिनविरोध
पाटस, ता. १२ : पाटस (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना संदीप पोळेकर यांची बिनविरोध निवड झाली.
पाटस ग्रामपंचायतीच्या सरपंच अवंतिका शितोळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी सुनील गायकवाड, तलाठी संतोष येडुळे, ग्रामसेवक संदीप लांडगे यांच्या उपस्थितीत सरपंचपदासाठी रंजना संदीप पोळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या सतरा आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित सरपंच पोळेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अवंतिका शितोळे, योगेंद्र शितोळे, बाळासाहेब पासलकर, दत्तात्रेय पोळेकर, प्रशांत शितोळे, संतोष वरघडे, उमेश पोळेकर, ग्रामपंचायतीचे सदस्य, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
रंजना पोळेकर यांची सरपंचपदी निवड होताच गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांची गावातून मिरवणुक काढण्यात आली. सर्वांना विश्वासात घेऊन गावाच्या विकासाच्या दृष्टीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
PNE23T36433