Wed, Sept 27, 2023

भोरगिरी भीमाशंकर येथील आरोग्य शिबिराला प्रतिसाद
भोरगिरी भीमाशंकर येथील आरोग्य शिबिराला प्रतिसाद
Published on : 30 April 2023, 4:58 am
भीमाशंकर, ता. ३० : भोरगिरी भीमाशंकर येथे सीआयओ क्लब, पुणे आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या वतीने ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मोफत रक्त तपासणी, इतर शारीरिक तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच औषधोपचार करण्यात आले. या शिबिराचा सुमारे ३०० जणांनी लाभ घेतला.
याप्रसंगी सजिथ चक्कींगल, उमेश चव्हाण, अजित पाटील, राजीव मित्तल, राहुल मरगू आदी उपस्थित होते. तसेच डॉ. राजेंद्र महाजन यांच्यासह इतर डॉक्टर, नर्स आदींनी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. शिबिरासाठी जितेंद्र जवळकरं, विमल कुमार आदींनी प्रयत्न केले. सीआयओ क्लब हा पुणे येथील आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांचे तज्ज्ञ अधिकारी यांचा क्लब आहे.