जिल्हा प्रशासन पुरविणार नागरिकांना ऑनलाइन वाळू

जिल्हा प्रशासन पुरविणार नागरिकांना ऑनलाइन वाळू

पुणे, ता. १४ : शिरूर तालुक्यातून वाहणाऱ्या घोडनदीजवळ पहिले दोन वाळू डेपो (केंद्र) जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहेत. या नदीतून गाळमिश्रित वाळू काढण्यास परवानगी मिळाल्यामुळे हे डेपो उभारण्यात येणार आहे. त्यामधून पुणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करून वाळू पुरविली जाणार आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार राज्य सरकारने नवीन वाळू धोरण ठरविले आहे. त्यानुसार वाळू लिलाव प्रक्रियेला प्रतिबंध घालून नागरिकांना ऑनलाइन वाळू पुरविण्याचे धोरण राज्य सरकारने ठरविले आहे. त्यानुसार जिल्ह्यात तपासणी करताना शिरूर तालुक्यातून घोडनदी वाहत असून निमोणी आणि चिंचणी या ठिकणी मोठ्या प्रमाणात गाळ आणि वाळू असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे याठिकाणी पूर येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नदीतून गाळ आणि वाळू यांत्रिक पद्धतीने काढण्याबाबत जिल्हाप्रशासनाला मान्यता दिली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वाळूचे पहिले दोन डेपो शिरूर तालुक्यातच निश्चित केले आहे. यांत्रिक पद्धतीने वाळू उपसा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
--------
शासनाच्या नवीन धोरणानुसार चिंचणी आणि निमोणी या ठिकाणी पहिले दोन वाळू केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली असून, यांत्रिक पद्धतीने गाळमिश्रित वाळू काढून पुन्हा शुद्धीकरण करून वाळूचे डेपो तयार करायचे आहे. डेपोसाठी गायरान जमिनींची जागा देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या थेट मागणीनुसार ऑनलाइन नोंदणी करून ६०० रुपये प्रतिब्रास दराने पुणेकरांना तसेच नगर जिल्हावासीयांना वाळू प्राप्त होण्यास सुरुवात होईल.
- संजय बामणे, जिल्हा खनिकर्म अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com