निमोणे सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय भोस
गुनाट, ता. ३१ : निमोणे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी विजय भोस तर उपाध्यक्षपदी उषा मानसिंग काळे यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष दत्तात्रेय जगदाळे तर उपाध्यक्ष भाऊसाहेब हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती.
नव्याने निवडीसाठी सोसायटी संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी आर. बी. वाळूंज यांनी काम पाहिले. यावेळी बबन ढोरजकर, यमराज काळे, दत्तात्रेय जगदाळे, भाऊसाहेब हिंगे, आबासाहेब सोनवणे, राजेंद्र कोरेकर, दिलीप हिंगे, पुरुषोत्तम जगदाळे, श्रीधर साळुंके सचिव सुजित फराटे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
46255, 46256
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.