मुलींच्या व्हॉलीबॉलमध्ये आज जेतेपदाची लढत
पुणे, ता. ७ : प्रभात रस्त्यावरील सिंबायोसिस स्कूल, भिलारेवाडीचे आर्यन्स वर्ल्ड स्कूल, दिघी येथील रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय व चंदनगर येथील केंद्रीय विद्यालयाने आपापले सामने जिंकून पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स १६ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य, अंतिम व तिसऱ्या स्थानासाठीचे सामने सोमवारी खेळले जाणार आहेत.
डेक्कन जिमखाना येथे ही स्पर्धा सुरू आहे. सिंबायोसिस स्कूलने उपांत्यपूर्व सामन्यात शिवणे येथील वॉलनट स्कूलचा २५-८, २५-११ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. सिंबायोसिसकडून राष्ट्रीय खेळाडू सिद्धी सणस, मनवा टन्नू व स्वराली कुलकर्णी यांनी, तर वॉलनटकडून ओवी माळी, मेखला प्रभू यांनी चमकदार कामगिरी बजावली. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत आर्यन्स वर्ल्ड स्कूलने चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलवर २६-२४, २५-१६ असा विजय मिळविला. विजयी संघाकडून पूर्वा मालुसरे, रितिका ठोकळे व काव्या पांचग्रीकर यांनी, तर एल्प्रो इंटरनॅशनलकडून उर्वी पवार, अनिता पालव व मनुश्री पाटील यांनी अष्टपैलू प्रदर्शन केले.
रोशनी जयस्वाल, प्राजक्ता वाजे व धनश्री गुजरच्या दमदार कामगिरीच्या बळावर रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालयाने तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल संघाचा २५-७, २५-१५ असा आणि शेवटच्या उपांत्यपूर्व लढतीत केंद्रीय विद्यालयाने फुरसंगी येथील वॉलनट स्कूलचा २५-९, २५-१६ असा पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश निश्चित केला.
अन्य निकाल : (उपउपांत्यपूर्व फेरी) सिंबायोसिस स्कूल, प्रभात रस्ता वि. वि. परांजपे स्कूल २५-६, २५-९, वॉलनट स्कूल, शिवणे वि. वि. पीजीकेएम स्कूल, कोंढवा २५-२३, १९-२५, १६-१४, रामचंद्र गायकवाड स्कूल वि. वि. डीएसआर स्कूल २५-९ २५-६, नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे २५-१७, २५-१७.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

