स्वातीताई सुतार यांचा नवा ‘मुळशी पॅटर्न’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातीताई सुतार यांचा नवा ‘मुळशी पॅटर्न’
स्वातीताई सुतार यांचा नवा ‘मुळशी पॅटर्न’

स्वातीताई सुतार यांचा नवा ‘मुळशी पॅटर्न’

sakal_logo
By

स्वातीताई सुतार यांचा नवा ‘मुळशी पॅटर्न’

मुळशी तालुक्यातील कासार आंबोली येथील पोलिस पाटील स्वाती गणेश सुतार यांनी कोरोना काळात विविध उपक्रम राबवित सामाजिक व पर्यावरणपूरक बांधिलकी जोपासली. परप्रांतीयांना, गोरगरीब व मजुरांना शिधा वाटप केले. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी ‘महाराष्ट्र सरकार झिंदाबाद अशा जल्लोषात घोषणा दिल्या. हा नवा ‘मुळशी पॅटर्न’ त्यांनी प्रशासनाला केलेल्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे तयार झाला. तसेच, स्थानिक नागरिकांना मास्क-सॅनिटायझर वाटपापासून लसीकरणापर्यंत विविध मदत केली.

- स्वाती गणेश सुतार,
पोलिस पाटील, कासारआंबोली (ता. मुळशी)

मुळशी तालुक्यातील कासार आंबोली येथील पोलिस पाटील स्वाती गणेश सुतार यांनी विविध उपक्रम राबविले आणि कोरोना काळात सामाजिक व पर्यावरणपूरक बांधिलकी जोपासली. कोरोनाकाळात ‘महाराष्ट्र सरकार झिंदाबाद अशा जल्लोषातील घोषणा मजुरांनी बसमधूनच दिल्या आणि तालुक्याचा एक नवा ‘मुळशी पॅटर्न’ झाला, तो केवळ कासार आंबोली येथील पोलिस पाटील स्वाती सुतार यांनी प्रशासनाला केलेल्या नियोजनबद्ध सहकार्यामुळे. तालुक्यातील परप्रांतीय मजुरांनी मुळशीतून स्वगृही जाताना मुळशीबद्दल व्यक्त केलेले धन्यवाद महत्त्वाचे ठरले.
स्वाती सुतार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे, परप्रांतीय, गोरगरीब व मजुरांना शिधा वाटप व जेवण, कोरोनाकाळात औषध फवारणी, लसीकरण, मास्क व सॅनिटायझर, गोरगरीब कोरोनाग्रस्तांना मानसिक आधार देऊन बेड मिळवून दिले. शासकीय यंत्रणेमार्फत ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब व हिमोग्लोबिन तपासणी केली. स्थानिकांना क्वारंटाइन केले व बाहेरून आलेल्यांची माहिती प्रशासनास दिली. त्यामुळे कोरोना फैलावास प्रतिबंध झाला. परप्रांतीयांना वैद्यकीय दाखले दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. रेशनचे नियोजनबद्ध वितरण केले. प्रतिबंधित भागासाठी प्रशासनास मदत केली. महिला बचत गट व ग्रामसंघास व्यवसाय प्रशिक्षण देऊन आर्थिक व मानसिक सक्षमीकरण केले. तंटामुक्तीसाठी यशस्वी प्रयत्न केले. सार्वजनिक सण व समारंभावेळी मंडळांचे अध्यक्ष व पोलिस यंत्रणेचा दुवा म्हणून यशस्वी कामगिरी केली. विविध निवडणुका शांततेत व सौदार्हपूर्ण वातावरणात पार पाडण्यात सहभाग घेतला. कोरोनाकाळात साहित्य आणण्यापासून अंत्यविधी पार पडेपर्यंतचे सर्व सोपस्कारांची जबाबदारी पार पाडली.
याबाबत स्वाती सुतार म्हणाल्या, ‘‘तहसीलदार अभय चव्हाण, पौडचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, मंडल अधिकारी सुहास कांबळे, तलाठी नामदेव पासलकर आणि बीट अंमलदार राजेंद्र शितोळे यांच्या मार्गदर्शनामुळेच मी विविध उपक्रम यशस्वी राबविले. त्याचे श्रेय सर्व प्रशासकीय अधिकारी, माझे कासार आंबोली ग्रामस्थ आणि माझे कुटुंब यांना द्यावे लागेल.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00476 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top