सरपंचाचा माजी सरपंचावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरपंचाचा माजी सरपंचावर हल्ला
सरपंचाचा माजी सरपंचावर हल्ला

सरपंचाचा माजी सरपंचावर हल्ला

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ३० : वेगरे (ता. मुळशी) येथील माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर शुक्रवारी (ता. ३०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. या घटनेत चारजणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सरपंच मीननाथ कानगुडे व अभिषेक कानगुडे यांना अटक केली आहे.
याबाबत पौड पोलिसांनी माहिती दिली की, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता वेगरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामसभा चालू असताना भाऊ मरगळे यांनी मागील ग्रामसभेचे प्रोसिडिंग व घरकुल यादीबाबत विचारणा केली असता सरपंच मीननाथ कानगुडे यांनी, ‘मी सभेचा अध्यक्ष आहे, तुम्ही माझ्या परवानगीशिवाय बोलायचे नाही,’ असे म्हटले व ग्रामसभेतून बाहेर जाऊन हातात लाकडी दांडके घेवुन येऊन राजेंद्र गुंड यांच्या अंगावर धावले. त्यावेळी भाऊ मरगळे हे त्यांच्यामध्ये गेले. त्यावेळी मीननाथ कानगुडे यांनी मरगळे यांच्या डाव्या हातावर व खांद्यावर दांडक्याने मारहाण केली. तसेच, अभिषेक कानगुडे व मुन्ना पोळेकर यांना मोठ्याने आवाज देऊन, ‘भाऊ मरगळे याला जिवंत मारून टाका व येथेच पुरून टाकू,’ असे म्हणाले. त्यावेळी मुन्ना पोळेकर याने त्याचे हातातील सुरा भाऊ मरगळे यांच्या डोक्यात मानेवर व खांद्यावर मारून गंभीर दुखापत केली. तसेच, मीननाथ कानगुडे यांनी अभिषेक कानगुडे याच्या हातातील कोयता घेऊन मरगळे यांच्या अंगावर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारला व गंभीर दुखापत केली.
दरम्यान, मरगळे यास उपचारासाठी वॅगनर मोटारीमधून घेऊन जात असताना अभिषेक याने गाडी अडवून गाडीची काच कोयत्याने फोडली. त्यानंतर लवार्डे येथील पाटबंधारे विभागाच्या कॉलनीसमोर एकाने बुलेट गाडी आडवी लावून मोटार अडवली व मरगळे यांच्या गाडीवर समोरून दगड मारून गाडीची काच फोडली.
याबाबतचा पुढील तपास उपनिरीक्षक श्रीकांत जाधव हे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00491 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top