भरे क्रीडा संकुलात उन्हाळी क्रीडा शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरे क्रीडा संकुलात
उन्हाळी क्रीडा शिबिर
भरे क्रीडा संकुलात उन्हाळी क्रीडा शिबिर

भरे क्रीडा संकुलात उन्हाळी क्रीडा शिबिर

sakal_logo
By

पिरंगुट, ता. ४ : भरे (ता. मुळशी) येथील तालुका क्रीडा संकुलात उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात चौदाहून अधिक क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ध्रूवतारा फाउंडेशन व मुळशी स्पोर्टस् सेंटरच्या संयुक्त विद्यमाने मुळशीतील विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅथलेटिक्स, आर्चरी, फूटबॉल, क्रिकेट, कुस्ती, टेबलटेनिस, कबड्डी, मल्लखांब, तलवारबाजी, योगासने, मार्शल आर्ट, नेटबॉल आदी खेळांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुळशी तहसीलदार कार्यालय, मुळशी पंचायत समिती, चैतन्य विद्या प्रतिष्ठान बावधन, तालुका क्रीडा शिक्षक संघटना व भरे ग्रामपंचायत आदी सहयोगी संस्था सहकार्य करणार आहेत.
या शिबिरात ३१ मेपर्यंत रोज सकाळी ७ ते ९ या कालावधीत सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. शिबिरात येण्यासाठी बसची सुविधा केल्याची माहिती शिबिर प्रमुख सचिन ववले यांनी दिली. नोंदणीसाठी ९०२८०९४४५४ व ८८८८९८७१८८ या मोबाईलवर क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00493 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top