
मुळशीतील ३८ जागांसाठी ग्रामपंचायत पोटनिवडणूक
पिरंगुट, ता. ६ : मुळशी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींतील ३८ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, त्यासाठी ५ जून रोजी मतदान, तर ६ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
याबाबत मुळशी तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे १३ मे ते २० मे या कालावधीत (१४ मे, १५ मे व १६ मेची सार्वजनिक सुटी वगळून) रोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सादर करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होणार असून, छाननी संपेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख २५ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
निवडणूक होत असलेल्या सदस्यांची ग्रामपंचायतनिहाय संख्या पुढीलप्रमाणे- जातेडे- ३, टेमघर- १, डावजे- २, तव- १, पाथरशेत- २, मोसे खुर्द- १, वांजळे- १, वातुंडे- १, भोईणी- २, भोडे- १, माळेगाव- २, धामण ओहोळ- १, आंबेगाव- १, दारवली- २, भूगाव- २, आंबवणे- २, ताम्हिणी बुद्रुक- १, संभवे- १, शेडाणी- १, पोमगाव- १, वारक- ३, बोतरवाडी- १, उरवडे- १, जवळ- २, अंबडवेट- २.
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00501 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..