
मुळशीतील स्मशानभूमींना वीज पुरवठा देण्याची मागणी
पिरंगुट, ता. ७ : मुळशी तालुक्यातील सर्व गावांतील स्मशानभूमी व दफनभूमीला विद्यूत पुरवठा करण्याची मागणी पुणे येथील वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत माजी सभापती रवींद्र कंधारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम इंगवले व ज्ञानेश्वर साठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुळशी तालुक्यातील अनेक गावांमधील स्मशानभूमी व दफनभूमीला आजतागायत कोणतीही विद्युत पुरवठ्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे रात्री अपरात्री नागरिकांना अंत्यविधीसाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बऱ्याच स्मशानभूमी व दफनभूमी या गावापासून लांबवरच्या अंतरावर ओढा किंवा नदीच्या काठी आहेत. रात्रीच्यावेळी तेथे अंत्ययात्रा घेऊन जाताना व अंत्यविधी करताना विद्युत पुरवठा नसल्याने मोठी गैरसोय होते. पावसाळ्यात तर रात्रीच्यावेळी केवळ विद्युत पुरवठ्याअभावी अंत्यविधी करताच येत नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व असणाऱ्या स्मशानभूमी व दफनभूमींना लवकरात लवकर विद्युत पुरवठ्याची सोय करावी व तेथील परिसरात स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी.
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00503 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..