
आग्या मोहोळाच्या हल्ल्यात वेगरे येथे एकवीसजण जखमी
पिरंगुट, ता. ११ : वेगरे (ता. मुळशी) येथे आग्या मोहोळाच्या माशांनी केलेल्या हल्ल्यात एकवीसजण किरकोळ जखमी झाले. मंगळवारी (ता. १०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
वेगरे येथील वेगरेवाडी व निरगुडवाडी या दरम्यान गावठाणाचा भाग आहे. तेथे लक्ष्मीचे देवस्थान आहे. या देवीचा विधी करण्यासाठी मूळ गाव वेगरे असलेले, परंतु सध्या पुनर्वसन होऊन विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे वास्तव्यास असलेले गायकवाड कुटुंब रविवारी (ता. ८) तर, ओव्हाळ कुटुंब पुणे व मुंबईहून देवीला सवाष्णी जेवण देण्याच्या विधीसाठी आले होते. मंगळवारी सकाळी टेमघर धरणाच्या पाणलोटक्षेत्राच्या काठावर असलेल्या देवीचा विधी करण्यासाठी गेल्यावर अचानक गायकवाड कुटुंबातील एका महिलेवर आग्या मोहोळाच्या माशांनी हल्ला केला. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या अन्य महिलांवरही माशांनी हल्ला चढविला. दरम्यान, काही पुरुष मंडळी आली आणि त्यांनी सतरंजीच्या साह्याने सर्वांना लपेटून घेतले. तरीही आतील महिला, पुरुष व लहान मुलांवर माशांनी हल्ला केला. यावेळी पाच जण धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले होते. सुदैवाने ते हल्ल्यापासून बचावले.
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00512 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..