
पिरंगुटची सारा ठरली सर्वात लहान ओपन वॉटर ड्राइवर
पिरंगुट, ता. १४ : पिरंगुट (ता. मुळशी) येथील सारा सलिल तांबोळी हिने वयाच्या दहाव्या वर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग, तारकर्ली येथून आंतरराष्ट्रीय प्रोफेशनल ओपन वॉटर ड्राइवरमध्ये प्रशिक्षण घेऊन समुद्रात संचार केला. यात तिने आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवले आहे. सारा तांबोळी हिचा पुण्यामधील सर्वात लहान आणि संपूर्ण भारतातील पहिल्या पाच सर्वात लहान प्रोफेशनल ओपन वॉटर ड्राइवरमध्ये समावेश झाला आहे.
सध्या सारा भुकूम (ता. मुळशी) येथील संस्कृती शाळेमध्ये इयत्ता पाचवीत शिकत असून तिने इतक्या कमी वयात केलेल्या धाडसाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. तिने सिंधुदुर्ग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग येथे प्रशिक्षण घेतले. यशस्वी प्रशिक्षणानंतर वेंगुर्ला रॉक आणि निवती दिपघर येथे स्कूबा डायविंग केले. कोच घनश्याम मोर्जे यांनी तिला प्रशिक्षण दिले आणि नियमानुसार प्रात्यक्षिकाव्यतिरिक्त लेखी परीक्षेत सुद्धा साराने यश मिळवले. ही लेखी परीक्षा प्रोफेशनल असोसिएशन ऑफ ड्राइवर असोसिएशन, अमेरिका यांच्या तर्फे घेण्यात येते आणि प्रमाणपत्र तसेच लायसन्ससुद्धा त्यांच्याच मार्फत दिले जाते. साराचे वडील खासगी वित्त संस्थेत काम करत असून तिची आई ही गृहिणी आहे. भविष्यात साराला समुद्र शास्त्र आणि स्कूबा डायविंग या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करण्याची इच्छा असून ती आतापासूनच पुढील अभ्यासाची तयारी करत आहे.
0799
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00516 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..