
ग्रंथालय शिक्षक विभाग उपाध्यक्षपदी तानाजी कांबळे
पिरंगुट, ता. १६ : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय शिक्षक विभागाच्या उपाध्यक्षपदी पुणे येथील तानाजी कांबळे, तर सदस्यपदी ज्ञानेश्वर रासकर यांची निवड झाली. संघटनेचे अध्यक्ष विलास सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस संघटनेचे माजी कार्याध्यक्ष व ज्येष्ठ ग्रंथपाल शंकरराव घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. कांबळे हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुंढवा येथील लोणकर माध्यमिक विद्यालयात, तर रासकर हे शिवणे येथील नवभारत हायस्कूल या विद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. यावेळी जळगाव येथील विनोद भंगाळे यांची कार्याध्यक्षपदी, नगर येथील उल्हास देव्हारे यांची संघटकपदी, कोल्हापूर येथील विजय जाधव, नगर येथील पंढरीनाथ दिघे यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड केली. यावेळी ग्रंथपालांच्या समस्या, वेतन, आदींबाबत चर्चा झाली व शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00568 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..