मुळशीत भाजपकडून तुळशी रोपांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशीत भाजपकडून
तुळशी रोपांचे वाटप
मुळशीत भाजपकडून तुळशी रोपांचे वाटप

मुळशीत भाजपकडून तुळशी रोपांचे वाटप

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २१ : देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीमध्येही निर्विवाद यश मिळविल्याने मुळशी तालुका भाजप युवा मोर्चाच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
उरवडे (ता. मुळशी) येथील नागरिकांना पेढे वाटप व तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांत नवीन चैतन्य आणि ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. या वेळी सुरेखा सावंत, ताई शिंदे, संगीता चोरे, अमर जोशी, राजेंद्र परब, पी. यादव, अवदेश परशार, अनिरुद्ध सरकार, पिंटू वंजारी आदी उपस्थित होते. भाजप युवा मोर्चाचे मुळशी तालुक्याचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00575 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top