विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला रिंगणाचा आनंद विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला रिंगणाचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला रिंगणाचा आनंद
विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला रिंगणाचा आनंद
विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला रिंगणाचा आनंद विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला रिंगणाचा आनंद

विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला रिंगणाचा आनंद विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला रिंगणाचा आनंद

sakal_logo
By

पिरंगुट , ता. १० : कासार आंबोली (ता.मुळशी) येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्वप्राथमिक आणि माध्यमिक विभागात हा सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. अभंग, श्लोक, भजन, कीर्तन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
आषाढीनिमित्त दिंडी आणि रिंगण सोहळ्याचा आनंद विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी लुटला. यावेळी प्राचार्या रेणू पाटी म्हणाल्या रि या प्रकारच्या आनंददायी उपक्रमांचा शालेय विद्यार्थ्यांना आनंद तर मिळतोच पण या आनंदोत्सवात सर्वधर्म समभावाचा आणि आपल्या आपल्या रुढी परंपरा जपण्याचा संदेश दिला जातो. त्यांच्या आनंदातून ऐक्याची भावनाही वाढीस लागते. "
ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे, संचालक कुणाल भिलारे, प्रशासकीय व्यवस्थापक यशस्विनी भिलारे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कांबळे, माजी उपसरपंच उमेश सुतार, सामाजिक कार्यकर्ते गणेश भिलारे तसेच ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन आनंद लुटला.
मुख्याध्यापिका रेणू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडला.

00987

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00606 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..