लवळे येथील चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लवळे येथील चोऱ्यांमुळे
ग्रामस्थांमध्ये घबराट
लवळे येथील चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट

लवळे येथील चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १० : लवळे (ता. मुळशी) परिसरात गेल्या वीस दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी दोन चोऱ्या झाल्याच्या घटना घडल्या. या चोऱ्या चक्क भर दुपारी बारा वाजता झाल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी (ता. ९) येथील गावठाणातील भरवस्तीतील खेडकर कुटुंबीयांतील ज्येष्ठ महिलेला दमदाटी करून अज्ञात चोरट्यांनी दीड तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून पोबारा केला. या बाबत ज्येष्ठ महिला लीला मारुती खेडकर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. हे अज्ञात चोरटे अॅक्टिव्हा या दुचाकीने आले होते. दोन अज्ञात चोरटे तोंडाला कापड बांधून तसेच अंगावर रेनकोट घालून दुपारी खेडकर यांच्या घरात घुसले. त्यावेळी लीला खेडकर (वय ७२) या टीव्ही पाहत होत्या. चोरट्यांनी त्यांना बाथरूममध्ये बळजबरीने ओढत नेऊन त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत कापून पलायन केले.

सुमारे वीस दिवसांपूर्वीही येथील शितोळे वस्तीवर पावणेसात लाख रुपयांचे दागिने व रोख रकमेच्या चोरीची घटना घडली. या बाबत निखिल अशोक शितोळे (वय ३१) यांनी फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांनी शितोळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली. चोरलेल्या मालात सोन्याचा राणीहार, सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे पान, सोन्याची मनगटाची माळ, सोन्याचे कानातील झुंबे, चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, हार, समई या दागिन्यांचा तसेच पन्नास हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00607 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top