टेमघरमध्ये अठरा टक्के पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेमघरमध्ये अठरा टक्के पाणीसाठा
टेमघरमध्ये अठरा टक्के पाणीसाठा

टेमघरमध्ये अठरा टक्के पाणीसाठा

sakal_logo
By

पिरंगुट , ता. ११ : लवार्डे (ता. मुळशी) येथील टेमघर धरणातील पाणीसाठा ०. ६८ टीएमसी इतका म्हणजे अठरा टक्के झाला आहे. गेल्या आठवडाभर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने संततधार हजेरी लावल्याने धरणातील साठा वाढू लागला आहे. यावर्षी धरणाच्या क्षेत्रात आजअखेर ९०३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. या पाणी साठ्यामुळे पुणेकरांची किमान पंधरा दिवसांची तहान भागणार आहे.
२०१ मध्ये या धरणाची साठवण क्षमता दहा मीटर उंचीने वाढविण्यात आल्याने पाण्याची साठवण क्षमताही दीड टीएमसीने वाढली आहे. या धरणाला गळती असल्याने ती गळती थांबविण्यासाठी सलग चार वर्षे सातत्याने ग्राउटिंगचे काम करावे लागले आहे. गळतीमुळे २०१४ ते २०१८ या कालावधीत या धरणाच्या ग्राउटिंगचे काम करावे लागले. सलग चार वर्षांनंतर सुमारे ९५ टक्के गळती थांबल्यामुळे या धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने साठा जमा होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00608 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..