
पानशेत-धामण ओहोळ रस्ता ठप्प
पिरंगुट, ता. २२ : मुळशी तालुक्यातील मोसे खोऱ्यातील पानशेत-दासवे-धामण ओहोळ या महामार्गावरील रस्ता गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व यावर्षीही झालेल्या पावसाने वाहून गेला आहे. त्यामुळे पानशेतमार्गे लवासा ही वाहतूक वर्षभरापासून ठप्प आहे. पळसे व पडळघर या परिसरात मुलाजी मरगळे या शेतकऱ्याच्या शेतासह रस्ताही वाहून गेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत.
या रस्त्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतुल चव्हाण व अजय भोसले, स्थानिक पदाधिकारी व विविध गावच्या सरपंचांनी भेट देऊन पाहणी केली. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यावेळी करण्यात आली. यावेळी या खोऱ्यातील पानशेत ते दासवे या रस्त्यावरील विविध ठिकाणच्या मोऱ्यांच्या पुलांची वाढवावी, अशी मागणीही दासवे ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत मोरे यांनी केली.
यावेळी आडमाळचे सरपंच हेमंत पासलकर, बुवा पासलकर, धामण ओहोळचे सरपंच शंकर शेडगे, शिवाजी शेडगे, भोयणीचे सरपंच राजेंद्र दबडे, चिंतामण सांबरे, वसंत वाटाणे, मुगावचे मारुती मरगळे, संजय दोन्हे, पळसेचे सरपंच प्रकाश वरघडे, संतोष हाळंदे, प्रदिप हाळंदे, गणपत भालेराव, काळू ओव्हाळ, गणेश मारणे, मधुकर दोन्हे, संजय कचरे, रवींद्र मरगळे, गणेश पवार आदी उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामस्थ विनोद शर्मा यांनीही या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे.
पानशेत ते धामण ओहोळ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ३२ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास महामंडळाच्या निधीतून हा निधी उपलब्ध होणार आहे.
- महादेव कोंढरे, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मुळशी तालुका
PRG22B01021
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00622 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..