
मुळशीत अन्नधान्याच्या किटचे वाटप
पिरंगुट, ता. २४ : मुळशी तालुका भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने तालुक्यातील गरजूंना अन्नधान्य आणि भाजीपाला वाटप करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध संस्था व गरजूंना सुमारे अडीच हजार किलो अन्नधान्याची किट वाटण्यात आली.
भुकूम येथील संजीवनी वृद्धाश्रम, सुतारवाडी येथील संस्कृती प्रतिष्ठानचे आदित्य प्रांगण विशेष मुलांची शाळा, पिरंगुट, कासार आंबोली व उरवडे परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांतील महिला सफाई कर्मचारी, आदिवासी वस्तीवरील बांधवांना, विविध कंपन्यांतील कामगार, पदपथावरील छोटे व्यावसायिक, जामगाव येथील कामगार वसाहतीतील कामगार, बस स्थानकांवरील गोरगरीब व गरजू आदींना ही मदत देण्यात आली. घोटावडे फाटा येथील शिवशक्ती चौकातील मजूर अड्ड्यावरील महिला कामगारांना धान्यांचे कीट व भाजीपाला देण्यात आला.
कार्याध्यक्ष सागर सोपानराव मारणे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या उपक्रमास वेद मारणे, नामदेव पडळकर, सुजित पाटोळे, सागर सोनवणे, कुंडलिक नामदेव पडळकर तसेच मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
01035
Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00631 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..