''आत्मा''अंतर्गत आंबेमोहोराच्या लागवडीस प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''आत्मा''अंतर्गत आंबेमोहोराच्या लागवडीस प्रारंभ
''आत्मा''अंतर्गत आंबेमोहोराच्या लागवडीस प्रारंभ

''आत्मा''अंतर्गत आंबेमोहोराच्या लागवडीस प्रारंभ

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २४ : मुळशी तालुक्यात कृषी विभागातर्फे आंबेमोहोर या तांदळाच्या लागवडीच्या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला आहे. रिहे (ता.मुळशी) येथील वेताळबाबा शेतकरी बचत गटाच्या शेतकऱ्यांच्या शेतात रोपांची लागवड, तंत्रज्ञान व त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाणासाठी
चारसूत्री पद्धतीच्या लागवडीस ''आत्मा''अंतर्गत प्राधान्य देण्यात येत आहे.

पुणे येथील प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे व तालुका कृषी अधिकारी कुडल हसरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मुळशी तालुक्यात सुरू करण्यात आला. प्रत्यक्षिकापूर्वी तालुका कृषी अधिकारी कुडल हसरमनी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे फायदे तसेच कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक विश्वनाथ काळभोर यांनी आंबेमोहोर वाणाची प्रथमच लागवड करण्यात येत असल्याने चारसूत्री पद्धतीने लागवडीचे फायदे सांगितले.


चारसूत्री पद्धतीची अवलंब
लागवडीसाठी पंधरा सेमी बाय पंचवीस सेमी या अंतरावर चिमण्या असलेली दोरी उपस्थित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली. लागवडीनंतर युरिया ब्रिकेट गोळीचा वापराबाबतचे फायदे सांगून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे शंका निरसन करण्यात आले. या भात लागवडीचे नियोजन विश्वनाथ काळभोर, विलास गवळी यांनी केले होते. वेताळबाबा शेतकरी गटाचे सदस्य रामचंद्र शिंदे यांच्या शेतावर या चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी विलास शिंदे, कमलाकर शिंदे, भरत शिंदे, सुनील शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.


आंबेमोहोर नामशेष होण्याच्या वाटेवर
मुळशीत आंबेमोहोर वाणाचा तांदूळ नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. सुवासिक आणि चवदार असूनही या तांदळाच्या उत्पादनाकडे येथील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. मात्र, सुवासिक असूनही उत्पादनाला दगाफटका देणारा आंबेमोहोर, कसदार असूनही खायला नकोसा झालेला दोडकी, साळ आदी वाणांकडे शेतकऱ्यांनी काणाडोळा केला. त्यामुळे तालुक्यात एकूण भात लागवडीच्या केवळ एखादा टक्काच आंबेमोहोर दिसून येतो. त्यामुळे या वाणाकडे शेतकऱ्यांनी पुन्हा वळावे म्हणून शासनाच्या कृषी विभागाने आंबेमोहोर वाणाच्या भात लागवडीचा प्रकल्प हाती घेतला आहे.

कृषी विभागाकडून यासाठी पुढाकार, मार्गदर्शन
१. २२ शेतकऱ्यांच्या शेतात पिकाला जाणार आंबेमोहोर
२. सात हेक्टर क्षेत्रावर राबविला जातोय प्रकल्प
३. बियाणे, खते, औषधे शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध
४. बीजप्रक्रिया, रोपे तयार करणे, पीक काढणीसाठी मार्गदर्शन

01038

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00632 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top