मुठा ते पोटेवाडी फाटा रस्त्याची चाळण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुठा ते पोटेवाडी फाटा रस्त्याची चाळण
मुठा ते पोटेवाडी फाटा रस्त्याची चाळण

मुठा ते पोटेवाडी फाटा रस्त्याची चाळण

sakal_logo
By

पिरंगुट, ता. १० : मुळशी तालुक्यातील मुठा ते बहुली या राज्यमार्ग क्रमांक ११५ वरील मुठा ते पोटेवाडी फाटा या रस्त्याची चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. दुरवस्था झालेल्या या रस्त्यावरून चारचाकीच काय दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी आहे.

अजित पवार पालकमंत्री असताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून अर्थ संकल्प योजनेमधून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र नवीन सरकार आले आणि विविध विकासा कामांना स्थगिती देताना या रस्त्याच्या कामालाही स्थगिती दिली गेली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुठा खोऱ्यातून पुण्यातील खडकवासला, शिवणे, कोंढवे आदी परिसरात जायला जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर केला जातो. बहुलीमार्गे सांगरूण व पुण्याला जायला हा रस्ता सोयीचा आहे. पावसाळ्यापूर्वीच सध्या या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे झाले होते. मात्र निधी मिळूनही नव्या सरकारने विकास कामांना
स्थगिती दिल्याने या रस्त्याची आणखी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नव्या सरकारचे विकासकामांकडे लक्ष नाही. सत्तेच्या खेळखंडोबात मूलभूत विकासाकामांना खीळ बसली आहे. विकासकामांना आडमुठेपणाने स्थगिती देणे योग्य नाही. अजितदादा पालकमंत्री असताना दीड कोटी रुपये मंजूर झाले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा निधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र शिंदे सरकारने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिल्याने रस्ता आणखी खराब झाला आहे. या रस्त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दुरुस्ती करावी, अन्यथा मुठा खोऱ्यातील नागरिकांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडणार आहोत.
- महादेव कोंढरे, मुळशी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

01087

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00658 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..