पिरंगुटला आरोग्य शिबिराचा १६० जणांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिरंगुटला आरोग्य शिबिराचा १६० जणांना लाभ
पिरंगुटला आरोग्य शिबिराचा १६० जणांना लाभ

पिरंगुटला आरोग्य शिबिराचा १६० जणांना लाभ

sakal_logo
By

पिरंगुट , ता. ९ : ग्रामपंचायत सदस्य महेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. येथील भैरवनाथ मंदिरात भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीरात रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, रुग्ण समुपदेशन व मोफत औषध वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य शिबिराचा १६० जणांनी लाभ घेतला.
शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मुळशी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आकाश जाधव यांच्या सहकार्यातून पार पडलेल्या या शिबिराचे उद्‌घाटन पोलिस पाटील प्रकाश पवळे यांच्या हस्ते झाले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे पुणे शहराचे उपाध्यक्ष व भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन संचेती यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ऍक्वाफार्म कंपनी व आशापुरी डेव्हलपर्स यांच्यावतीने अडीचशे गरजूंना मोफत अन्न धान्यांच्या किटचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, पिरंगुट हायस्कूलमधील शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सचिन खैरे, राजाभाऊ वाघ, तुषार पवळे, रमेश पवळे, मोहन निकटे, तुषार पवळे, अंकुश नलावडे, मयूर केदारी, चंद्रकांत चोरघे, आदित्य गोळे, अनिकेत वाघ, गणेश वाघ, तानाजी निकटे,पवन मते आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00660 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..