...तर मुळशीकरांना दरडोई वाढीव पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर मुळशीकरांना दरडोई वाढीव पाणी
...तर मुळशीकरांना दरडोई वाढीव पाणी

...तर मुळशीकरांना दरडोई वाढीव पाणी

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २३ : मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा १ ची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्ताव नुकताच शासनाकडे पाठविला आहे. तेथील मंजुरी मिळाल्यास मुळशीकरांना दरडोई वाढीव पाणी मिळणार आहे. या योजनेच्या सुधारित योजनेस तांत्रिक मंजुरी व तत्वतः मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यतेसाठी शिफारस करून तो प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, अशी माहिती माजी सभापती बाबा कंधारे यांनी दिली.
योजनेबाबत कंधारे यांनी सांगितले की, मुळशी प्रादेशिक योजना टप्पा १ मध्ये माले, संभवे, दिसली, जामगाव, शेरे, अकोले, कळमशेत, शिळेश्वर, भादस, असदे, खुबबली, रावडे, करमोळी, सावरगाव, चाले, दखणे, पौड, कोंढावळे, दारवली, मुगावडे, अंबडवेट, घोटावडे, भरे, पिरंगुट, कासार आंबोली, आंदेशे , मुलखेड आदी गावांचा समावेश होतो. या गावांसाठी ही योजना सन २०२३ ची लोकसंख्या गृहीत धरून योजनेचा आराखडा तयार केला होता. त्यानुसार ही योजना राबविली आहे. मात्र, या योजनेमध्ये गृहीत धरण्यात आलेली लोकसंख्या व आता सध्या अस्तित्वात असलेली लोकसंख्या यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भविष्याचा विचार करता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियोजन तसेच या भागातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असलेली वाढ व नागरिकरण याचा अभ्यास करता पुढील ३० वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन सदर योजनेची नव्याने पुनर्रचना करणे गरजेचे होते. त्यानुसार, आहे त्याच योजनेतून यापूर्वीची गावे व त्यांच्यामधून वगळण्यात आलेल्या वाड्यावस्त्या यांचा सुद्धा विचार होणार आहे. त्यामुळे सध्या दरडोई मिळणारे ४० लिटर पाणी वाढून ५५ लिटर होणार आहे. या योजनेसाठी पौड येथे नवीन फिल्टर प्लांट तयार करण्यात येत आहे.

शासनाला पाठविलेले अंदाजपत्रक
१. योजनेची किंमत - १७८.५४ कोटी
२. लोकसंख्या - सन २०२४ - १३,८८०८ व्यक्ती , सन २०३९ - २२,९५८८
३. दरडोई पाणी पुरवठ्याचा दर - ५५ लिटर प्रतिदिन प्रति माणशी
४. पंपिंगचे तास - १६ तास .
५. योजनेचा दरडोई खर्च - ४९४० रुपये.
६. एक हजार लिटर पाण्याचा दर - ६.३२ रुपये.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00680 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..