चौक तुमचा आवाज मुळशीकरांचा...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौक तुमचा आवाज मुळशीकरांचा...!
चौक तुमचा आवाज मुळशीकरांचा...!

चौक तुमचा आवाज मुळशीकरांचा...!

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २६ : यंदा कोरोनाचे निर्बंध हटविल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवात मुळशीतील ढोल पथकाचा निनाद जल्लोषात घुमणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या अडथळ्यांनंतर यंदा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी मुळशीतील ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी रोज रात्री गावागावात ढोल, ताशा आणि झांजांचा आवाज कानी पडू लागला आहे. गेली दोन वर्षे निर्बंध आल्याने ढोल पथकातील वादकांचाही हिरमोड झाला होता.
शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक या पथकात सहभागी झालेले दिसतात. दिवसभराची सगळी कामे आवरून संध्याकाळी ते सरावासाठी शाळेच्या मैदानात, मंदिरासमोर अथवा पाऊस नसेल तर थेट माळरानावरही खेळाडू आणि वादक जमा होत आहेत. सध्या या ढोल पथकांचा कसून सराव सुरु आहे. अलीकडे ढोल पथकाकडे केवळ खेळ म्हणून न पाहता शारीरिक, मानसिक सबलीकरण आणि सांस्कृतिक वारसा जतन तसेच सामाजिक ऐक्याची भावना अशा विविध अंगांनी पाहिले जात आहे.
पुणे आणि मुंबई आदी शहरात मुळशीतील पथकांना चांगली मागणी असते. तालुक्यात सुमारे सत्तरहून अधिक ढोल पथके असून कोळवण, मुठा, मोसे, रिहे, बेलावडे, भादस आदी खोऱ्यांसह धरण भागातील विविध गावांतील पथकांचा सध्या जोरदार सराव सुरू आहे.
बोतरवाडीतील शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पडवळ व न्यू हनुमान तरुण मंडळाचे प्रतिनिधी समीर गुजर म्हणाले, ‘‘यावर्षी आम्हाला पुण्यातील सात ते आठ गणेश मंडळांच्या सुपाऱ्या मिळाल्या आहेत. त्यातून सुमारे दीड ते दोन लाख रुपये मिळणार आहेत. यावर्षी या दोन्ही पथकांना सुमारे तीन लाख रुपयांची कमाई होणार आहे. या रकमेतून गावातील रुग्णांना मदत तसेच गावकीतील विविध उपक्रमांसाठी आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.’’

‘‘यावर्षी आम्हाला पुण्यातील दोन वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीसाठी निमंत्रणे आलेली असून सुमारे लाखभर रुपये त्यातून पथकाला मिळणार आहे. यावर्षीही मिळालेल्या बिदागीतून आम्ही मंदिर व शाळा सुशोभीकरणाबरोबरच गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करणार आहोत.’’
-गणेश मालेकर, प्रतिनिधी, जय हनुमान तरुण मंडळ, लवळे (ता. मुळशी)

‘‘यावर्षीही आम्हाला मुंबई येथील बोरीवलीमधील गणेश मंडळाची दीड लाख रुपयांहून अधिक रकमेची सुपारी मिळाली आहे. या रकमेतून आम्ही मंदिर सुशोभीकरण, विशेष मुलांना तसेच शालेय गरजू मुलांना साहित्याचे वितरण करणार आहे.’’
-माऊली वाघ, हनुमान तरुण मंडळ, पवळे आळी, पिरंगुट (ता. मुळशी)

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00682 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..