लवासा परिसरात चोऱ्या करणारा जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लवासा परिसरात चोऱ्या करणारा जेरबंद
लवासा परिसरात चोऱ्या करणारा जेरबंद

लवासा परिसरात चोऱ्या करणारा जेरबंद

sakal_logo
By

पिरंगुट, ता. २६ : दासवे (ता. मुळशी) येथील घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीला पौड पोलिसांनी अटक केली असून, आरोपीकडून तीन लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुरेश कोंडीबा मरगळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सात तोळे सोने व बत्तीस हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली.
लवासा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुमारे दहा ते अकरा चोऱ्या झालेल्या आहेत. आरोपी सुरेश मरगळे हा लवासा गेटलगतच्या रामनगर परिसरात राहतो. तो एका खासगी व्यक्तीच्या बंगल्याचे केअर टेकर म्हणून काम पाहत असतो. त्याने काम करत असलेल्या घरातील कपाटे फोडून काही रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंची चोरी केली. दासवे येथील सुनील गोरे यांच्या घरातील तीन तोळे सोने; तर शिवाजी गोरे यांच्या घरातील सात तोळे सोने त्याने चोरी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
परिसरात गेले अनेक महिने सातत्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे पौड पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या हाताचे ठसे घेतले होते. तसेच तेथील बॅंक खात्याच्या तपशिलावरूनही संबंधित आरोपींना संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यात सुरेश मरगळे याला अटक केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Prg22b00686 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..